गणित विषयाचे आकलन झाले म्हणजे जीवनाचे गणित चुकत नाही

0

 

फैजपूर दि . 7 –
शिक्षण माणसाला आयुष्य सुंदर आणि आनंददायी जगावे असे शिकवते मात्र त्यात ज्यांनी गणित विषय घेऊन पदवी घेतली आहे त्यांना आयुष्याचे गणिते, समस्या आणि संकटे सहज सोडविता येतात. त्यामुळे गणिताची भीती सोडून आनंदाने गणित शिकावे आणि भविष्य उज्जवल करावे असा संदेश प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी गणित दिवसाच्या औचित्याने दिला.
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात गणित विभागाच्या वतीने राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. थोर भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस हा संपूर्ण भारतात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
महाविद्यालयात साजरा झालेल्याकार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांच्या शुभहस्ते झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम वर्ष विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांनी जागृती देवकर, हेमलता चौधरी, दामिनी चौधरी, निकिता महाजन आणि पायल चौधरी यांनी स्वागत गाऊन कार्यक्रमाची सुरेल सुरुवात केली.
कार्यक्रमाची सुरुवात लोकसेवक मधुकरराव चौधरी व गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली.
राष्ट्रीय गणित दिवसाच्या औचित्याने कावयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव च्या शैक्षणिक वर्ष 2017-18 च्या गुणवत्ता यादीतील गणित विषयात प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्णपदकाच्या मानकरी ठरलेल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु विशाखा अविनाश महाजन व व्दितिय क्रमांक प्राप्त कु संज्योत सुधाकर गोसावी ह्या विद्यार्थ्यांनीचा विभागातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच अविष्कार 2018 मधील विभागातील सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि गुणवंतांचा परिचय गणित विभागप्रमुख प्रा पी बी पाटील यांनी केले. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातर्फे दिल्या जाणार्‍या परितोषिकांची माहिती दिली.
कु विशाखा आणि संज्योत यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना महाविद्यालयाचे तसेच गणित विभागाचे ऋण व्यक्त केले.विभागातील प्रा एच जी नेमाडे यांनी श्रीनिवास रामानुजन यांचे जीवनचरित्र उपस्थितांसमोर मांडले.
अध्यक्षिय भाषणात बोलतांना प्रा डॉ पी आर चौधरी यांनी सांगितले की, गुणवंत विद्यार्थ्यांकडून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी व भविष्यात उज्जवल यश प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव मोठे करावे.
कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा प्रा अनिल सरोदे तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका व गणित विषयाच्या प्राध्यापिका मा प्रा सौ वंदना बोरोले व विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विभागातील प्रा डॉ पंकज सोनवणे यांनी केले.
यशस्वीतेसाठी श्री नीळकंठ पाटील, श्री प्रकाश भिरुड, श्री शेखर महाजन, श्री चेतन इंगळे, श्री अमोल राणे यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.