गटशिक्षणाधिकारी कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात संविधान दिन जळगाव तालुका गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, असोदा केंद्र प्रमुख भगवान वाघे, वावडदा केंद्रप्रमुख कैलास तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

गटशिक्षणाधिकारी चौधरी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन केले.” माझे संविधान, माझा अभिमान ” उपक्रमांतर्गत शैक्षणिक कार्यक्रम प्रत्येक शाळेत नियोजनबद्ध राबविण्याचे आवाहनही चौधरी यांनी केले.

कार्यक्रमास मुख्याध्यापक अविनाश मोरे, प्रभारी मुख्या. राजीव वानखेडे, विजय लुल्हे यांसह नरेंद्र कांबळे, सहारे, पाटोळे, मोतीखाये, पवार, सिमा पाटील, शेळके, सोनवणे, संध्यान, वाघ आदी बी.आर.सी. कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.