गंगा सफाई चं आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्यांनी गंगेत प्रेतांची आहुती दिली-मंत्री यशोमती ठाकुर

0

फैजपुर | प्रतिनिधी

ना यशोमती ठाकूर या केंद्र सरकार वर टिका करताना म्हणाल्या की गंगेची सफाई करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्यांनी गंगेत प्रेतांची आहुती दिली. आम्ही सगळे जण मिळून या देशाचं रक्षण करणार. काँग्रेस पुन्हा स्थापित होणार आणि लालकिल्ल्यावर पुन्हा तिरंगा फडकवणार असा विश्वास व्यक्त करून आपण सर्वांना जागे व्हावे लागेल. देशाच्या स्वातंत्र चळवळीचा खरा इतिहास लोकांसमोर यावा व स्वातंत्र लढ्यातील काँग्रेसचा सहभाग अधोरेखित व्हावा या उदेशाने”व्यर्थ ना हो बलिदान” या अभियाना अंतर्गत आयोजित आज फैजपुर येथे धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

नेहरुजींनी हा देश बांधला त्या देशाला विकायचं काम खऱ्या अर्थाने आताची सरकारने चालवलं आहे.अशी तोफ डागली व सर्वांनी  देशाच्या स्वातंत्र्य लढाईचा इतिहास प्रत्येकाने दररोज दहा लोकांपर्यंत पोचवा असे आवाहन केले. रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी प्रास्तविकातून हा फैजपुरच्या पावन भूमीवर हा कार्यक्रम होत असल्याचे गर्वाने सांगून या ठिकाणी ग्रामीण अधिवेशनाला आलेल्या थोर पुरुषाचे चरणस्पर्श झाल्याने ही भूमी पवित्र झाली.आहे आणि देशाच्या स्वातंत्र्य लढाईचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काँग्रेस तर्फे “व्यर्थ ना हो बलिदान” हा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात सर्वांनी तनमनाने सहभागी व्हावे असे आवाहन केले.यावेळी व्यर्थ न हो बलिदान अभियानाचे समनव्ययक अभय छाजेड यांनीही मनोगत व्यक्त केले.

व्यासपीठावर माजी खा डॉ उल्हास पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील,माजी आ रमेश चौधरी,डी जी पाटील,प्रदीप पवार,काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ,अशोक खलाने,मगन जाधव,स्वातंत्र्य सैनिक हरचंद शिवराम भंगाळे,मुफ्ती हारून,काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मूनवर खान, काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मोरेश्वर राणे,माजी आमदार नीलकंठ फालक,योगेंद्रसिंग पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन व आभार जनता शिक्षण मंडळ खिरोदा सचिव प्रभात चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ पी आर चौधरी,प्राचार्य डॉ व्ही आर पाटील यांच्यासह फैजपूर नगरपरिषद गटनेते कलीम खान , विधानसभा अध्यक्ष वसीम जनाब, नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे,मलक शरीफ सर, प्रसिद्धी प्रमुख गणेश गुरव सर,जावेद जनाब तसेच सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थित होते.

या कार्यक्रमात स्वातंत्र सैनिक हरचंद शिवराम भंगाळे यांच्यासह पाच स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी व चार उत्तराधिकारी यांचा मान्यवारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे मोटारसायकल रॅलीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यांनंतर मान्यवर मोटारसायकल रॅलीसह खिरोदा येथील थोर स्वातंत्र सेनानी कै धनाजी नाना चौधरी व बाळासाहेब चौधरी स्मृतीस्थळावर नेते भेट देऊन अभिवादन करून खिरोदा येथे हुतात्मा चौकात महात्मा इ व थोर स्वातंत्र सेनानी कै धनाजी नाना चौधरी पुतळ्याला व लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या स्मृती स्थळाला भेट देवून मान्यवरांनी अभिवादन केले यानंतर फैजपुर येथे कार्यक्रमाला सुरुवात झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.