खेडी येथील शाळेच्या भिंतीला तडे : विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात

0

जळगाव (हेमंत सोनवणे) : जळगाव शहरातील खेडी बुद्रुक येथे शिक्षणाच्या मंदिराची वाट लागली आहे. शाळेच्या भिंतींना तडे गेले असून कोणत्याही क्षणी भिंती कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुर्घटना घडलीच तर गोरगरिबांच्या असंख्य चिमुकल्यांच्या जिवावर बेतणार आहे. आपल्या मुलाचे भविष्य उज्ज्ज्वल व्हावे यासाठी पालक आपल्या हाताने आपल्या भविष्याला मृत्यूच्या गृहेत सोडून जात आहेत. दरम्यान, प्रशासनाने खबरदारी म्हणून येथे एका कागदावर इमारत जिर्ण आणि धोकेदायक असल्याची सुचना लावली असून असंख्य विद्यार्थी आणि शिक्षक जिव धोक्यात घालून ज्ञानदान व ज्ञानार्जनाचे कार्य करीत आहेत.

सर्व शिक्षा अभियान स्कूल चले हम अभियान राबविले जाते तसेच प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण ते शहरापासून शाळेच्या इमारती डिजीटल झाल्या आहेत. मात्र,  शहरातील खेडी बुद्रुक शाळा क्र 24 ची इमारत ही पूर्णपणे जीर्ण झालेली आहे.भीमराव वाल्किकराव देशमुख शाळा क्र 24 खेडी बुद्रुक येथील शाळेच्या  इमारतीचे  बांधकाम हे  70 ते 80 वर्षांपूर्वी झालेले असून आज या शाळेत अंगणवाडी ते  इयत्ता 1ते 3 री चे वर्ग  सकाळच्या वेळेला भरतात व इयत्ता 4 ते 6 वीचे वर्ग हे दुपारी 12वाजेला भरत असतात. या शाळेच्या इमारतीचे बांधकाम खूप जुने असून आणि चुन्यामध्ये झालेले असे पाहावयास मिळते. या इमारतीचे  मागच्या साईडने एक भिंतीचा कोपरा पूर्णपणे तडा पडलेला दिसून येत आहे. मधल्या सुट्टीत विद्यार्थी या शाळेच्या आवारात चहूबाजूने खेळत असतात. काही विद्यार्थी शाळेच्या मागच्या बाजूला लघुशंकेला सुद्धा जातात. मात्र, शाळेच्या शौचालयाची देखील अवस्था खूप वाईट आहे. विद्यार्थ्यांना उघड्यावरती लघुशंकेला जावे लागते. शौचालय फक्त नावालाच आहे. अशा परिस्थितीत जर शाळेच्या इमारतीचा भाग जर कोसळला आणि तिथे काही घटना घडल्यास या घटनेला कोण जबाबदार देणार? पुर्णपणे  या इमारतीचे बांधकाम त्वरित करायला हवे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी महानगरपालिकेला याबाबतीत वारंवार सूचना दिली आहे.अशी माहिती तरुणांनी दिली. मनपा याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहेे. मात्र, शाळेच्या आवाराच्या मुख्य द्वाराच्या भिंतीवरच सर्वाना सूचित करण्यात येते की, शाळेची जुनी इमारत अतिशय जीर्ण झालेली असून ती धोकेदायक स्थितीत आहे मागील बाजुची भिंत केव्हाही कोसळू शकते त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता कोणीही त्याठिकाणी खेळण्यासाठी लघवीकरिता उभे राहू नये अन्यथा होणार्‍या घटनेस किंवा हानीस आपण स्वतः जबाबदार राहाल शाळा प्रशासन व प्रशासन अधिकरी  जबाबदार राहणार नाही अशा सूचना पत्रक लावलेले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.