खुशखबर….अमेरिकेतील राजकीय घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये ६००० रुपयांनी घसरण

0

नवी दिल्ली : अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठे चढ-उतार झाल्याचं समोर येत आहे. या राजकीय बदलांमुळे कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये 6000 रुपयांनी घसरण झाली आहे.

शुक्रवारी म्हणजेच 8 जानेवारीला बाजार बंद होताच MCX वर चांदीच्या किंमतींमध्ये 6000 रुपयांपेक्षा कमी घट झाली. शुक्रवारी मार्च डिलीव्हरी असणाऱ्या चांदी 6112 रुपयांनी घसरून 63850 रुपये प्रति किलोवर पोहोचली. त्याचप्रमाणे मे महिन्यातील डिलिव्हरीची चांदी 6042 रुपयांनी घसरून 64,938 रुपयांवर बंद झाली.

सोन्याच्या किंमतीही घसरल्या

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरांमध्ये तब्बल 2000 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे. शुक्रवारी या आठवड्यातील बाजार बंद होताच MCX वर फेब्रुवारी डिलिव्हरीचं सोनं 2086 रुपयांनी घसरत 10 ग्रॅम सोनं 48818 रुपयांवर पोहोचलं. त्याचपद्धतीने एप्रिमल महिन्यातील सोनं 2077 रुपयांच्या घसरणीसह 48863 रुपयांवर पोहोचलं. इतकंच नाही तर जून महिन्यातील सोन्याच्या किंमतीही घसरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सोनं 962 रुपयांनी घसरून 50014 रुपयांवर बंद झालं.

आंतरराष्ट्रीय बाजारातील दर

अमेरिकेतील राजकीय वादळाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातही पाहायला मिळाला. या आठवड्यात फेब्रुवारी महिन्यातील सोन्याचा भाव 63.70 डॉलर (3.33 टक्के) घसरुन प्रति औंस 1849.90 डॉलरवर बंद झाला. यावेळी सोन्याच्या किंमती 1828 डॉलरच्या पातळीवर पोहोचल्या होत्या. तर मार्च महिन्याचील चांदी 1.76 डॉलर (6.49 टक्के) घसरून 25.49 डॉलर प्रति औंसपर्यंत बंद झाली.

सराफा बाजारातील दर

सोन्या-चांदीच्या घसरणीमुळे सराफा बाजारातही किंमतीवर दबाव होता. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या 614 रुपयांनी घसरून प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत 49763 रुपयांवर गेली. गुरुवारीदेखील सोन्याच्या किंमतीतील घसरण झाल्याची नोंद झाली. गुरुवारी सोने 714 रुपयांनी स्वस्त झाले होते. चांदीच्या दरातही 1609 रुपयांची जोरदार घसरण झाली. चांदीचा दर प्रति किलो 67518 रुपयांवर बंद झाले. गुरुवारी चांदीच्या भावातही 386 रुपयांची घसरण झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.