खा.उदयनराजे भोसलेंचा रविवारी भाजप प्रवेश!

0

राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह व धनंजय महाडिक भाजपाच्या वाटेवर

मुंबई- आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी कॉंग्रेसला पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक हादरे बसू लागले आहेत. पक्षातील बडे नेते राष्ट्रवादी रामराम करीत सत्ताधारी भाजपा तसेच शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने हादरलेल्या राष्ट्रवादीला आणखी धक्का बसणार आहे. साताराचे खासदार उदयनराजे भोसले येत्या रविवारी (1 सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, कॉंग्रेसचे जयकुमार गोरे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचाही भाजप प्रवेश निश्‍चित समजला जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर जनमत ढवळून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या दुसछया टप्प्याची सांगता 1 सप्टेंबरला सोलापूर येथे होत असून त्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी शहांच्या उपस्थितीत दोन्ही कॉंग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

उदयनराजे भोसले यांच्या निमित्ताने राष्ट्रवादीचा पहिला खासदार भाजपच्या गळाला लागला आहे. उदयनराजे हे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी त्यांना लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. उद्या किंवा परवा उदयनराजे हे लोकसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.