खामगावात नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे गटारी तुडुंब ; गटारीतील पाणी नागरिकांच्या घरात

0

खामगाव (प्रतिनिधी) :- नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे खामगाव शहरातील अनेक भागात पाऊस आल्यानंतर गटारी तुडुंब भरून त्यांचे पाणी रस्त्यावर तसेच नागरिकांच्या घरात घुसते. आधीच देशभरासह राज्यात सुद्धा कोरोना व्हायरसमुळे राज्यातील प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्ष असल्याचा गाजावाजा करते परंतु खामगाव नगरपालिका शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. तसेच तक्रार दिल्यानंतर सुद्धा त्या तक्रारी वर कार्यवाही होत नाही.

नगरपालिकेचे सफाई कर्मचारी सुद्धा चोखपणे आपली जबाबदारी पार पाडत नाही हा सर्व प्रकार नगरपरिषदेच्या कुंभकर्णी झोपेमुळे होत असतो अनेक वेळा खामगाव शहरातील नागरिक होत असलेल्या समस्येबद्दल नगरपालिकेमध्ये रितसर लेखी तक्रार देतात तसेच तोंडी तक्रार सुद्धा देतात परंतु त्या तक्रारींकडे नेहमीच नगरपालिका मुख्याधिकारी दुर्लक्ष करीत असतात या कारणाने अनेक वेळा समस्याग्रस्त नागरिक नगरपालिका मुख्याधिकारी यांची भेट घेण्याकरिता येत असतात परंतु नेहमीच्या ताटर स्वभावामुळे व हेकेखोरपणा मुळे नागरिकांच्या सोबत व्यवस्थितपणे चर्चा न करता उडवाउडवीची उत्तरे देण्यात पटाईत असलेला न.प. मुख्याधिकारी बोरीकर याच्या उद्घट वागणुकीमुळे समस्याग्रस्त नागरिक भडकून त्यांनी तो थेट कचरा नगरपालिकेमध्ये आणून टाकला या सर्व प्रकाराला मुख्याधिकारी यांचा स्वभाव जबाबदार असल्याची चर्चा खामगाव शहरात होत आहे तरी जिल्हाधिकारी महोदय यांनी नागरिकांची समस्या सुद्धा लक्षात घेऊन न.प. मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांचीसुद्धा चौकशी करावी

Leave A Reply

Your email address will not be published.