खानदेश आणि मराठवाडा सीमा केली सील

0

 शिदाड ता. पाचोरा | प्रतिनिधी   

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातगाव डोंगरी येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खानदेश आणि मराठवाड्याची हद्द असल्याने, वाहने एकमेकांच्या हद्दीत येऊ नये म्हणून पाचोरा डीवायएसपी ईश्वर कातकडे, सपोनि रवींद्र बागुल यांनी सदर हद्द शील केली आहे.     कोरोना व्हायरसमुळे जग हवालदिल झाल्याने, आपल्या शासनानेही या जीवघेण्या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांच्या हद्दी शील करण्याचे आदेश दिल्याने,  सातगाव डोंगरी येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खानदेश आणि मराठवाडा हद्द असल्याने पाचोर्‍याचे डिवायएसपी ईश्वर कातकडे आणि सपोनि रवींद्र बागुल, हवालदार पंडित साळी, शशिकांत मराठे यांनी महत्त्वाची हद्द सील केली आहे. राज्य रस्ता क्रमांक १८४ या मार्गावर खानदेशातून मराठवाड्यात आणि मराठवाड्यातून खानदेशात अनेक प्रकारची वाहने रात्रंदिवस सुरू असतात. मात्र जीवघेण्या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही कार्यवाही  करण्यात आली आहे. मराठवाड्यातून येणारी वाहतूक रोखली जाऊन प्रादुर्भाव टाळता येणार आहे. सातगाव डोंगरी येथील पो.पा. दत्तू पाटील गावातील नागरिकांना व दुकानदारांना सतत घरात बसण्यासाठी आवाहन करीत आहे. या कामी ग्रामस्थांनी पोलीस पाटलाचे कौतुक केले आहे. यावेळी गोकुळ वाघ, सुनील डांबरे, डी.आर.वाघ, उत्तमराव मनगटे, शंकर पवार,अनिकेत कहिठे, वाल्मीक आदमने, दीपक रहाटे, प्रमोद जाधव, राहुल पटील आदी गावकऱ्यांसाठी मदत करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.