सिव्हिलच्या काेराेना कक्षात केवळ एकच व्हेंटिलेटर

0

जळगाव | प्रतिनिधी 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोनाचा विशेेष कक्ष मंगळवारी नेत्र कक्षात स्थलांतरीत करण्यात अाला. या कक्षात सध्या अाठ रुग्ण दाखल असून याठिकाणी केवळ एकच व्हेंटिलेटर उपलब्ध अाहे. ही संख्या वाढवणे गरजेचे अाहे. मंगळवारी कक्षात १९० जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले; परंतु त्यांच्यात काही लक्षणे न दिसल्याने घरी साेडण्यात अाले. तर नव्याने एक २४ वर्षीय संशयित दाखल झाला. त्यामुळे अाता संशयितांची संख्या २९ वर पाेहाेचली. यातील २१ जणांचे अहवाल निगेटिव्ह अाले अाहेत. साेमवारी प्रलंबित असलेल्या ७ नमुन्यांपैकी २ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह अाहेत. जळगावात कोरोना कक्षात रोटरी क्लब ऑफ गोल्डसिटी रुग्णालय मदत करणार आहे.

काेराेनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक यंत्र, सामग्रीची गरज भासणार आहे. सिव्हिलमध्ये कोरोना कक्षात एकच व्हेंटिलेटर उपलब्ध आहे. त्यामुळे भविष्यात माेठी अडचणी येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ गोल्ड सिटीचे सदस्य नंदू अडवाणी, सतीश मंडोरा, चंदर तेजवाणी, प्रशांत कोठारी यांनी मंगळवारी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, डॉ. दत्तात्रय बिराजदार यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी व्हेंटिलेटर, ओटू माक्स, बाय पॅप आदी वस्तू पुरवण्याचे आश्वासन दिले. तसेच माजी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन काेराेना कक्षाची पाहणी केली. या वेळी त्यांसाेबत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे उपस्थित हाेते.

Leave A Reply

Your email address will not be published.