खळबळजनक ! धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराचा आरोप ; महिलेची ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार

0

औरंगाबाद  : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती देखील समोर आली असून, पोलिसांनी तिच्या तक्रारीची देखील घेतली नसल्याचे देखील तिने ट्वीट केले आहे.

या अधिकारी आणि नेत्यांना केले महिलेने ट्वीट

धनंजय मुंडे यांनी माझ्यावर अत्याचार केला असल्याची माहिती सदर महिने तिच्या ट्वीटर अकाऊंट वरून केला आहे. मात्र, सदर घटनेची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नसल्याचेही तिने म्हटलं आहे. दरम्यान सदर महिलेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील ट्वीट केले आहे. त्याचबरोबर देशाचे पंतप्राधान नरेंद्र मोदी यांनाही ट्वीट केले आहे. मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, सुप्रिया सुळे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीटमध्ये टॅग करत मदत करण्याची विनंती देखील केली आहे.


२००६ पासून अत्याचार सुरु होते? 

सदर महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत म्हंटल आहे की, तिच्या इच्छेविरुद्ध २००६ पासून अत्याच्यार करण्यात आला आहे. तुला जर गायिका बनायचे असले तर, तर मी बॉलीवूड मधील मोठ्या निर्मात्यांशी भेटून तुला लॉंच करीन असं आमिष देखील दाखवण्यात आले असल्याचे पीडित महिलेने म्हंटल आहे.

काय आहे प्रकरण?

दरम्यान सदर मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे कि, महेबूब शेख यांनी नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. १० नोव्हेंबर रोजी मला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावलं आणि १४ नोव्हेंबरच्या रात्री ९  वाजण्याच्या सुमारास भेटण्याच्या उद्देशाने गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला. दरम्यान याप्रकरणी औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.