खतांची भाव वाढ कमी करून बीटी बियाणे लवकर उपलब्ध करून देण्यात यावे

0

पारोळा – खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकर्‍यांना दे धक्का तंत्र अवलंबण्यात आल्याने शेतकरी चिंतातुर झालेला आहे आहे यावर्षी राज्यात जिल्ह्यांमध्ये हे दुष्काळी स्थिती आहे हे आधीच दुष्काळात पशुधनाचा चारा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना शेतकरी हतबल झालेला आहे त्यात अजून एक भर म्हणून दुष्काळात तेरावा महिना रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केली आहे रासायनिक खतांच्या किमतीत प्रति बॅग दोनशे ते अडीचशे रुपये वाढवून जणू काही शेतकर्‍यांना गालावर पडलेली आहे शेतकर्यांनी पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकलेला आहे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या वेदना कमी होताना दिसत नाही आधी बोंड आळी दुष्काळ पशुधन वाचविणे पशुधनाला चारा नाही पिण्यास पाणी नाही चारा छावण्या दुष्काळाच्या गरम हवेत विरल्या फक्त घोषणांचा व योजनांचा पाऊस झाला शेतकर्‍यांच्या पदरी घोर निराशा झाली त्यात रासायनिक खतांच्या किमतीत भर शेतकर्‍यांच्या कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे रासायनिक खतांच्या किमती कमी करण्यात याव्या अशी शेतकरी संघटना पारोळा करून मागणी करण्यात आलेली आहे.

बीटी बियाणे बाबत धोरण चुकीचे दिसून येत आहे एक जूनला जर कापूस बियाणे मिळत असेल तर बियाणे विक्री करणार्‍या दुकानांवर एकाच वेळी खूपच गर्दी दिसून येणार आहे गेल्या मागील चार-पाच वर्षांपूर्वी बियाणे घेण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांना एक कटू अनुभव आलेला आहे व तशी वेळ येऊ नये तसेच तारांबळ उडू नये व त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी लवकरात लवकर शेतकर्‍यांना बियाणे उपलब्ध करून द्यावे.

दादाची बोंड आळी अनुदान दुष्काळ अनुदान पंतप्रधान पेन्शन योजना यापैकी शेतकर्‍यांना लवकरात लवकर अनुदान द्यावे असे शेतकरी संघटना पारोळा करून तहसीलदार एबी गवांडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील जोगलखेडे शिरीष पाटील  नरेश चौधरी भिकन पाटील अभिमान आटकर भटू पाटील उखा मोरे उखा मोरे प्रवीण पाटील रामदास पाटील विलास पाटील अशोक पाटील दिनेश पाटील रामकृष्ण पाटील छोटूलाल पाटील इत्यादी शेतकरी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.