खतांचा दुष्काळ संपणार ; सावदा रेल्वे स्थानकावर लवकरच खतांचे रॅक उपलब्ध होणार

0

रावेर (प्रतिनिधी) : रावेर, मुक्ताईनगर, यावल, बोदवड, भुसावळ या तालुक्यातील कृषिकेंद्र मालक व खते विक्री व्यापारी संघाच्या सदस्यांनी खासदार रक्षाताई खडसे यांची 11 जुलै रोजी भेट घेतली होती. या पाच तालुक्यांना खते घेताना जळगाववरून वाहतुकीसाठी अतिरिक्त खर्च लागत होता व खते उपलब्ध होण्यास विलंब लागत असल्याने शेतकऱ्यांना ऐन हंगामात खते उपलब्ध होत नव्हती. या सदस्यांनी मागणी केली होती, सावदा रेल्वे स्थानक येथे जर खतांचे रॅक खाली करण्यासाठी थांबा रेल्वेने उपलब्ध करून दिल्यास वाहतुकीसाठी लागणारा अतिरिक्त वेळ व खर्चाची बचत होईल.

यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांनी 11 जुलै रोजी भुसावळ रेल्वे विभागाचे डीआरएम यांच्याशी पत्रव्यवहार करून सावदा येथे खतांच्या रॅकसाठी थांबा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या पाठपुराव्याला यश मिळून लवकरच सावदा रेल्वे स्थानक येथे खतांचे रॅक खाली करण्यासाठी थांबा उपलब्ध होऊन शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे. या संदर्भात खासदार रक्षाताई खडसे यांनी सावदा रेल्वे स्थानक येथे पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.