धक्कादायक : पाचोरा येथे क्वारंटाईन युवकाची गळफास घेवून आत्महत्या

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोऱ्यातील क्वारंटाईन सेंटर मध्ये दि. २० रोजी रात्री उशिरा बांबरुड (राणीचे) ता. पाचोरा येथील एका ३३ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हा युवक दि. १९ जुलै रोजी येथे दाखल झाला होता. त्याचे स्वॅब तपासणी साठी दि. २० जुलै रोजी घेण्यात आले असुन त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

दरम्यान घटनास्थळी दि. २१ रोजी ३.३० वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे , डॉ.अमित साळुंखे यांनी भेट देत पाहणी केली. सदर युवकावर शासकीय प्रोटोकाॅल प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. युवकाने आत्महत्या का केली ? याचे निश्चित कारण समोर आले नसुन पोलिस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.