खडसेंच्या अडचणीत वाढ; मंदाताई खडसे यांच्या विरोधात अटक वॉरंट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

पुणे येथील भोसरी भूखंड गैरव्यवहार  प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्यात आल्याने खळबळ उडालेली आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांचा अटकपुर्व जामीन अर्ज मुंबई सेशन कोर्टाने फेटाळला आहे, असे टि्वट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. तसेच अजामीनपात्र वॉरंट (non-bailable warrant)जारी केले आहे. यामुळे मंदाताई खडसे यांना अटक होण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणामुळे न्यायालयाने दिलासा दिला आहे.

एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या पुण्यातील भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. या प्रकरणात त्यांचे जावई गिरीश चौधरी अटकेत आहेत. या व्यवहारात मदत केल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना ईडीने गेल्या आठवड्यापूर्वी अटक केली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. मंदाताई विरुद्ध अटक वॉरंट जारी झाला असतांना एकनाथ खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणामुळे न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई सेशन कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी आता २१ ऑक्टोंबर रोजी ठेवली आहे.

मंदाताई खडसे यांनी याप्रकरणी आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून मुंबई सत्र न्यायालयामध्ये अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली असता त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला असून त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.