कौटुंबिक वादात मध्यस्थी करणाऱ्याचीच हत्या

0

पिलखोड, ता.चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पिलखोड येथे कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत भांडण सोडवायला गेलेल्या एकाचा खून झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे
याबाबत समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील पिलखोड येथे काका पुतण्याच्या कौटुंबिक वादातून भांडण सुरू होते. काका-पुतण्यांनी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या गावातील व्यक्ती धोंडू पाटील वय 62 गेले असता त्यांना हाणामारीत जबर मार लागून खून झाला आहे. तर महेश धोंडू पाटील वय 28 हा गंभीर जखमी झाला आहे.

त्याला रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिस स्टेशनचे एपीआय सचिन बेंद्रे व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.