कोळवद येथे कृषिदुताकडून कृषी दिन उत्साहात साजरा

0

यावल :- तालुक्यातील कोळवद येथे कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

यावेळी पांडुरंग डुकरे, प्रदीप गिते, गोला भरतकुमार, गुडूरु साईतेजा, वैभव हांडगे, गोपाल हेंबाडे, हे कृषिदूत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळवद येथील मुख्याध्यापक नशिबा तडवी व केंद्रप्रमुख एन. डी. तडवी ग्रामसेवक दीपक तायडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी केंद्रप्रमुख  एन. डी.तडवी तसेच किशोर भोईसर यांनी विद्यार्थ्यांना कृषी दिनाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी दूत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मिळून शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले यानंतर सर्व कृषिदुतांनी मिळून उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.