कोळवद गावात कृषिदूत दाखल

0

यावल :- तालुक्यातील कोळवद येथे कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी शेती विषयाच्या अभ्यासासाठी दाखल झाले. यात पांडुरंग डुकरे, प्रदीप गिते, गोला भरतकुमार,  गुडूरु साईतेजा, वैभव हांडके व गोपाल हेंबाडे असे हे कृषिदूत कोळवद गावात 4 महिने थांबून परिसरातील शेती पद्धती व पीक प्रात्यक्षिकाची माहिती घेतली शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करणाऱ्या विविध कार्यकारी सोसायटीचे कामकाज कशा पद्धतीने चालते कर्जवाटप वसुली व् अन्य कामकाजाची माहिती समजून घेतली. सरपंच वत्सलाबाई संजय कोळी उपसरपंच प्रल्हाद चौधरी व ग्रामसेवक दीपक तायडे यांनी कृषी दुकान चे स्वागत करून कामाची माहिती दिली. यामुळे कोळवद गावातील शेतकऱ्यांना सुद्धा  शेती उत्पादनाबाबत अमोल माहिती मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.