कोरोना संकट काळात शेतक-यांचे शेतीपंप वीजबिल माफ करा

0

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे मागणी

बोदवड (प्रतिनीधी) : राज्यासह संपूर्ण देश आज कोरोना वैश्विक महामारीच्या संकटाला तोंड देत आहे. समोर बाजारपेठा खुल्या नसल्या कारणाने असंख्य शेतकऱ्यांचा शेतीमाल शेतातच कुजून गेला आहे.शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक मिळकतीचे मार्ग खुंटले आहेत.अश्यातच शेतीपंपाची येणारी मोठ्या रकमांची वीजबिले गरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आर्थिक भुर्दंड ठरत आहेत.

कोरोना महामारीच्या ह्या संकटात घरखर्च सांभाळून शेतीपंपाच्या विजबिलाच्या खर्चाचा मेळ घालणं शेतकऱ्याच्या आर्थिक आवाक्याबाहेर गेलं आहे.अश्या या संकटाच्या काळात लॉकडाऊनच्या कालावधीतील साधारणतः तीन महिन्यांची शेतीपंपाची वीजबिले माफ करण्यात यावेत अथवा अर्थव्यवस्थेचा ही विचार करता निदान निम्मी सवलत तरी देणेत यावी ही अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.असा निर्णय शासनाने घेतल्यास आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदन देताना संघटनेचे बोदवड तालुकध्यक्ष शुभम पाटील,यांचेसह अजय देवकर, अंकित सोनगिरे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.