अमळनेर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा चिंताग्रस्त

0

‘काले मेघा काले मेघा पाणी तो बरसा ओ’ अशी आर्त हाक बळीराजा देत आहे

अमळनेर (प्रतिनिधी):- गेल्या आठवड्यापासुन वरुण राजाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिला असल्याने राहिलेल्या कोरडवाहु शेतकऱ्यांनी उर्वरित राहिलेली मका व कापुस या पिकांची पेरणी पूर्ण केली असून निसर्गाच्या भरवशावर घरात ठेवलेले बी बियाणे शेतात पेरुन दिले आहे.

मात्र पेरलेल्या बियाण्याला कोऱ्या लागत असून कोवळ्या कोबांना चिमणी पाखरे खार किटक वान्या खात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची मोठी चिंता लागली आहे
पाऊस यावा यासाठी बळीराजा सारखे आकाशाकडे डोळे लावून बसला असून वरुण राज्याची आराधना करु लागला आहे.

पेरणी केलेली पिक व लागवडीची बियाण्याला कोऱ्या लागत असून खार , किटक खात आहेत. पिक अंकुराचेच होणाऱ्या नुकसानी बाबत शेतकऱ्यांनमध्ये मोठे चिंतेचे वातावरण असून पाऊस यावा यासाठी बळीराजा वरुण देवतेची मनोमन आराधना करू लागला आहे. महागडे बियाणे काळ्या आईत पेरून शेतकऱ्यांनी त्यांचे कर्तव्य केले. आता वरुण देवतेच्या चांगल्या आगमनाच्या कृपा आशीर्वादावरच बळीराजाचा हंगाम अवलंबून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.