‘कोरोना’ व्हायरसची लासुर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत होतेय तपासणी

0

लासुर ता.चोपडा | वार्ताहर

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावात तसेच परिसरातील चौगाव,चुंचाळे,मामलदे,उमर्टी आदी गावांमध्ये मुंबई,पुणे,बंगळुरू,सुरत,जम्मू तसेच इतर ठिकाणी कामधंद्यानिमित्त गेलेले लोक गावी परतू लागल्याने त्यांची तपासणी केली जात आहे.काल दुपारपर्यंत २०७ रुग्णांची नोंदणी झाली असून यात १०३ व्यक्ती लासुर यरथील असून त्यांना काही कोरोनाची लक्षणे आहेत का याबाबत तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत पाटील तसेच डॉ.दिनेश निळे करत आहेत.नोंदणी झालेल्यापैकी मुबई हुन आलेले ३५,पुणे-९४,जम्मू काश्मीर-८ तर पंजाब हुन देखील गहू काढण्याकमी ४ ते ५ जण आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.त्याचप्रमाणे मामलदे येथे एक व्यक्ती विदेशातून आली असून त्यांना होम क्वारँटाईन चा सल्ला दिला असून त्यांचा रोज आढावा प्रा.आ.केंद्रामार्फत घेतला जात आहे.  तपासणीसाठी प्रा.आ.केंद्र तसेच आशा वर्कर्स अशी विभागणी केली असून आशा वर्कर गावात फिरून सर्व्हे करुन त्यांना प्रा.आ.केंद्रात बोलवत आहेत आणि तसा अहवाल तहसीलदार यांच्याकडे पोहचवला जात असल्याची माहिती डॉ.प्रशांत पाटील यांनी दै.लोकशाहीशी बोलतांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.