भडगावात तीन मोटारसायकल स्वारां विरूद्ध गुन्हा दाखल

0

भडगाव | प्रतिनिधी
संपूर्ण जगात कोरोणाचा कहर वाढत आहे. या बाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस संपूर्ण देश लॉक डाऊन केले असून कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन नागरिकांना केले आहे. या बाबत माहिती असून सुद्धा नागरिक मोटारसायकल घेऊन बिनकामाचे फिरत आहे. म्हणून आज भडगाव पोलिस गस्तीवर असताना तीन मोटारसायकल स्वारां विरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करून मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. कुणीही घराबाहेर जाऊ नये अथवा मोटरसायकल फिरू नये असे आदेश आहे. भडगाव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे, पोलिस उपनिरीक्षक आनंद पटारे, पो. ना.लक्ष्मण पाटील, पो.कॉ. हिरालाल पाटील, जगन्नाथ महाजन, राजेंद्र पाटील, अरविंद पाटील हे पारोळा चौफुली वर गस्त घालत असताना आरोपी -१) सूचित नाना पाटील रा. पांढरद ता.भडगाव गाडी क्र. एम. एच.१९ . बी. पी.५८५७, बजाज डिस्कवर २) जितेंद्र नारायण पाटील रा. भडगाव  गाडी क्र. एम. एच .१९ बी. एफ.७८८८, टीव्हीएस स्टार, ३) विठ्ठल किसन पाटील रा. एरोंडोल गाडी क्र. एम. एच.१९ ए.वाय ५६११ हीरो पॅशन  यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भाग ५ गु.र.न.६०,६१,६२,/२०२० भा.द.वी कलम १८८ प्रमाणे वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पो. हे. कॉ. प्रल्हाद शिंदे, पो. ना. लक्ष्मण पाटील, किरण ब्राम्हणे हे करीत आहे.
सदर संचारबंदी लागू असल्याने कुणीही विनाकारण बाहेर फिरू नये अथवा मोटरसायकल फिरू नये. अत्यावश्यक सेवा असल्यास आपले आयकार्ड गळ्यात वापरावे किंवा गाडीवर स्पष्ट अक्षरात दिसेल असे लिहावे या शिवाय कोणीही विनाकारण दिसल्यास त्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल.अशी माहिती पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी दैनिक लोकशाही शी बोलताना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.