कोरोना लसी संदर्भात खुशखबर…..! रशियाची लस 92 टक्के प्रभावी

0

मॉस्को – करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी रशियामध्ये विकसित करण्यात आलेली स्पुटनिक-5 ही लस कोविड-19 विरोधात 92 टक्के प्रभवी असल्याचे निदर्शनास आले आहे. रशियातील आरोग्य मंत्रालयाने बुधवारी या लसीच्या यशस्वीतेबाबत माहिती दिली.

यापूर्वी गेल्याच आठव्ड्यात ही लस विकसित करणाऱ्या पिझर आणि बायोटेक या कंपन्यांनीही ही लस 90 टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक परिणामकारक असल्याचे म्ह्टले होते. अन्य औषधे घेत असलेल्या कोविड रुग्णांच्या प्रकृतीपेक्षा या लसीची चाचणी घेतली जात असलेल्या 20 उमेदवारांच्या प्रकृतीमध्ये अधिक सुधारणा अढळली आहे, असे रशियाच्या थेट गुंतवणूक निधीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

या लसीची परिणामकारकता गामालय सेंटरच्यावतीने वाढवण्यात आली आहे. ही परिणामकारकता उमेदवाराला लस टोचल्यानंतर 21 दिवसांनी घेण्यात आलेल्या आढाव्यामध्ये तपासली गेली आहे. या लसीचा कोणताही विपरीत परिणाम आढळलेला नाही. तसेच संबंधित उमेदवारांच्या प्रकृतीवर देखरेखही केली जात आहे, असेही आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले.

स्पुटनिक 5 चा हंगामी संशोधन डेटा अद्याप प्रकाशित केला गेलेला नाही किंवा अद्याप्‌ त्याचे पुनरावलोकनही केले गेलेले नाही. सध्या, स्पुटनिक-5 च्या क्‍लिनिकल चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात 40,000 स्वयंसेवकांवर चाचणी सुरू आहे. त्यापैकी 20 हजार स्वयंसेवकांना या लसीचा पहिला डोस दिला गेलेला आहे. तर 16 हजार स्वयंसेवकांना पहिला आणि दुसरा डोस देखील दिला गेलेला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.