कोरोना लसीकरण केंद्रास आ.सावकारेंची भेट ; १८८ नागरिकना दिली लस

0

वरणगाव : भुसावळ तालुक्यातील तेरा गावाना सलग्न असलेल्या तपत कठोरा बु ॥ येथील आरोग्य केंद्रावर  जेष्ठ नागरिकाना कोरोना लसीकरण सुरू झाल्याने आमदार संजय सावकारे यांनी भेट दिली तर ग्रामीण रुग्णालयात सोमवार पासुन सुरुवात होत आहे.

जेष्ठ नागरिकाना कोरोना लसीकरणाची सुरुवात झाल्या पासुन भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा बु ॥ येथील आरोग्य केंद्रावरही जेष्ठ नागरिकाना कोरोनाची लस दि ८ सोमवार रोजी पासुन सुरुवात झाली असुन आज पर्यत १८८ नागरिकाना हि लस देण्यात आली असुन लस घेतल्या नंतर आता पर्यत एकाही नागरिकाला या पासुन कोणत्याही प्रकारची हानी नाही किंवा दुष परिणाम नसल्याचे डॉ शुभागी फेगडे यांनी सागीतले असुन लसी करणा साठी नागरिकानी आरोग्य केंद्रावर येऊन आपली नावे नोंदवावी किंवा ऑनलाईन नोंदविण्याचे अवाहन त्यांनी केली तर गुरुवार रोजी सुरू असलेल्या लसी कर त्यावेळी आमदार संजय सावकारे यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णालयातील नागरिकाशी  सवाद साधुन त्यांची तब्बेती विषयी चौकशी केली या वेळी डॉ सीमा सोनवणे, सभापती वंदना उन्हाळे, भालचंद्र पाटील , जितू कोळी , प्रशांत पाटील , सागर मोरे, वासुदेव कोळी, सुनिल कोळी सुनिल नेहते इत्यादी उपस्थीत होते.

सोमवारला ग्रामीण रुग्णालयात लसी करणास होणार सुरुवात 

ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाची सुरुवात झाल्या नतंर ही वरणगाव शहरात याची सुरुवात होत नसल्याने राष्ट्रवादी कॉग्रास पार्टी व महा विकास आघाडी च्या शहरातील पदाधिकाऱ्यानी डॉ ऋतुजा हेडवे यांना आठ दिवसा आधी निवेदन देऊन जेष्ठ नागरिकाना कोरोना लसी करण सुरू करण्याची मागणी केली होती मात्र आठ दिवस उलटूही लसी करण सुरू न झाल्याने राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी आरोग्य मंत्री ना राजेश टोपे यांच्याशी सपर्क साधुन लसीकरणाची सुरुवात करण्याची मागणी केल्याने त्यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिक्षक यांना सोमवार दि १५ रोजी लसी करण करण्याच्या सुचना दिल्याने शहरातील नागरिकाना कोरोना ची लस उपलब्ध होणार असल्याचे राजेन्द्र चौधरी . यांनी सागीतले असुन शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करूण सुरक्षीत राहण्याचे आवाहन केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.