कोरोनानंतर आता महाराष्ट्रावर वादळी पावसाचं संकट

0

मुंबई : सध्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून देशासह महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या झपाटयाने वाढत आहे. महाराष्ट्रात ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या ८९ वर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर वारंवार प्रशासनाकडून नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र काही भागांमध्ये या आवाहनाला धुडकावत नागरिक घराबाहेर पडत गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोनाचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. अशातच आता महाराष्ट्रावर आणखी एका संकटाचं सावट आहे. राज्याच्या काही भागांवर पुढील 48 तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केला आहे.

औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात  मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यातील होणाऱ्या या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.