कोरोनाच्या सावटाखाली श्रीराम रथोत्सव साजरा

0

जळगाव । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथील श्रीराम मंदिर संस्थानचा श्रीराम रथोत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी सियावर रामचंद्र की जय, राम राम जय श्री राम, रामचंद्र हनुमान की जय अशा गगनभेदी जयघोषात  पाच पाऊले रथ ओढून हा उत्सव साजरा करण्यात आला.

कोरोनाचा वाढता संसर्ग बघता पोलीस प्रशासनाकडून रथोत्सवाला गर्दी होवू नये यासाठी रथाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करुन याठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची १५० वर्षाची थोर परंपरा लाभलेले श्री राम मंदिर संस्थांतर्फे कार्तीकी एकादशीनिमित्त बुधवारी श्रीराम रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ४ वाजता काकडा आरती व प्रभू श्री रामांच्या उत्सवमूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता रथ चौकात श्री राम मंदिर संस्थांनचे उत्ताराधिकारी वेदमुर्ती हभप श्रीराम महाराज जोशी यांच्या हस्ते शारदा वेद पाठशाळा व शहरातील समस्त ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्राच्या घोषात रथाची व उत्सवमुर्तीची महापुजा करण्यात आली. यानंतर श्रीराम मंदिरातून संत मुक्ताबाईच्या पालखीतून वाजंत्री व रामनामाच्या जयघोषात वाजगाजत उत्सव मुर्ती रथावर विराजमान करण्यात आली.

प्रमुख अतिथी म्हणून आ. राजूमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर उपस्थित होते.

प्रमुख अतिथी म्हणून आ. राजूमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर उपस्थित होते. यानंतर महाआरती होवून दुपारी १.१९ मिनीटांनी रथाची महाआरती होवून प्रभू श्रीराम नामाच्या जयघोषात पाच पावले रथ ओढण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.