कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथे बैठक संपन्न

0

मुक्ताईनगर – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता आज जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव सुनील सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक बी डि ओ ,टी एम ओ व नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय येथे बैठक घेण्यात आली

दिवसेंदिवस कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव सुनील सूर्यवंशी यांनी तालुक्यात पाहणी केली तसेच तहसील कार्यालय येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत कोरणा विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव होऊ नये यावर उपायोजना करणे संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच कोरोना रुग्णांवर होणारा औषधोपचार व विलगीकरण व्यवस्थेबाबत आढावा घेण्यात आला तसेच ऑक्सिजन बेड व ऑक्सिजन पुरवठा यावर देखील आढावा घेण्यात आला. तसेच उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे कोरणा विलगीकरण कक्षात व कोरोणा लसीकरण केंद्रात भेट देऊन रुग्णांची चर्चा करून उपचार याबाबत विचारणा केली सोबत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक योगेश राणे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश पाटील सहाय्यक व्हिडिओ राजकुमार जैन मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड निवासी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे किरण बावस्कर व उपजिल्हा रुग्णालय येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच मुक्ताईनगर व चांगदेव भागातील कोरणा प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी करून तेथील रुग्णांची वैद्यकीय उपचार याबाबत चर्चा करून संबंधित अधिकारी कर्मचारी यांना उपायोजना करणे बाबत सुनील सूर्यवंशी यांनी सूचना केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.