कोरपावली येथे सरपंचासह ग्रा.पं. सदस्यांचा राजीनामा

0

यावल  । तालुक्यातील कोरपावली येथे आजी-माजी प्रभारी सरपंचासह ग्रा.पं. सदस्यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतची सर्वसाधारण मासिक सभा सुरू असतांना सुमारे हजार ते दीड हजार महीला व पुरुषांचा मोर्चा हा ग्रामपंचायतीवर येवुन धडकला. या मोर्चातील ग्रामस्थांनी सरपंच आणी ग्रामसेवक यांना गावातील पिण्याच्या पाण्याबाबत विचारणा केली. यावर ग्रामसेवक प्रविण ज्ञानेश्‍वर सपकाळे यांनी ग्रामपंचायतीमध्ये ११ सदस्य असुन यातील ७ ग्रामपंचायत सदस्य हे नियमीत मासीक सर्वसाधारण सभेला गैरहजर राहात असल्याने गावाचे कुठलेही विकास कार्य करणे शक्य नसल्याचे सांगितले.

मागील ९ महीन्या पासून कोरपावली ग्रामपंचायत सरपंच पद रिक्त असुन आपल्या मिळाल्या प्रभारी सरपंच पदाच्या कार्यकाळात आपण सुमारे २५ लक्ष रुपयांचे गावातील सर्व पातळीवर विकास कामे केली आहेत. मात्र काही राजकारणी मंडळी या गावाच्या विकास कार्यात अंतर्गत राजकारण करीत असल्याने गावातील कुठल्याही विकासकामाचा आम्हास निर्णय घेता येत नसल्याने मी आणी आमच्या प्रभारी सरपंच मानिषा अकील तडवी, सदस्य सरफराज अहमद तडवी व अमोल लक्ष्मण नेहते आपल्या ग्रामपंचायतच्या सदस्य पदाचा राजीनामा ग्रामसेवक यांच्याकडे सोपविला आहे. या चौघांच्या पवित्र्याने खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.