रावेरात उद्या बौद्ध समाजाचा सामुहिक विवाह सोहळा

0

रावेर :- येथे फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशीय संस्था व समस्त बौद्ध समाज रावेर तालुका यांच्या सयुंक्त विद्यमाने उद्या दि.१२ मे रोजी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन शहरातील सरदार जी.जी.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये करण्यात आले आहे.

बौद्ध समाजातील पालकांनी आपल्या पाल्यांची नवे जास्तीत जास्त संख्येने नोंदणी फुले, शाहू, आंबेडकर सार्वजनिक वाचनालय तहसील कार्यालयासमोर रावेर येथे करून सामुहिक विवाह सोहळा समितीस सहकार्य करावे, असे आवाहन फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले आहे. हा सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. नोंदणी केलेल्या उपवर वधू वरांसाठी विशेष समाजकल्याण विभागामार्फत कन्यादान योजनेतून २० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. याची नोंद घ्यावी, त्यासाठी वधू-वरांचे शाळा सोडल्याचा किंवा जन्माचा दाखला, जातीचे दाखले, अधिवास दाखले, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो व विवाह झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत विवाह नोंदणी दाखला आणणे बंधनकारक आहे. विवाह नोंदणीकरिता संपर्क सामुहिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष्य राजेंद्र अटकाळे रावेर (मो.नं. ९७६४४९३५४५, ७७२१९३४३५८) यांच्याशी साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.