कोणाचेही फोन टॅप होणे चुकीचेच ; आ. चंद्रकांत पाटील

0

रावेर । माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅप झाल्याप्रकरणी चौकशी सुरू असताना भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा फोनदेखील टॅप झाल्याचा दावा एका इंग्रज वर्तमानपत्राने केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या फोन टॅप प्रकरणावर खडसे यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील कुणा नेत्यांचे फोन जर टॅप होत असतील तर हा प्रकार चुकीचाचे असून या प्रकरणी चौकशी होण्याची गरज आहे, असे मत आ. चंद्रकांत पाटील यांनी रावेर येथे पत्रकारांशी बोलत व्यक्त केले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीने एकत्रीतपणे जिल्हा बँक निवडणूक लढविण्याचे ठरविले तर आपण स्वत: मुक्ताईनगरमधून रिंगणात उतरणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी दिली. याप्रसंगी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपन पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, शिवसेना युवाजिल्हा प्रमुख अविनाश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, सुधाकर महाजन, गोपाळ सोनवणे, अरुण महाजन यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.