कोचुर येथे रोहिणी खडसे-खेवलकर यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

0

कोचुर, ता. सावदा : दि 19 रोजी सायंकाळी कोचुर ,चिनावल,वडगाव, खिरोदा परिसरात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे केळी बागांमधील केळी उन्मळून पडली आहे पोटरी भरलेली ज्वारी, मका,कपाशी  पूर्णपणे झोपली आहे आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी कोचुर खु, कोचुर बु येथे शेतांमध्ये जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सोबत दूरध्वनी वरून चर्चा करून नुकसान ग्रस्त शेतांचे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी केली.

यावेळी सोबत सावदा नगराध्यक्षा अनिताताई येवले, भाजप विधानसभा सह क्षेत्र प्रमुख शिवाजीराव पाटील, जि प सदस्य कैलास सरोदे, भाजप तालुका सरचिटणीस महेश चौधरी, मंडळ अधिकारी संदीप जयसवाल. तलाठी बाबर. मा.सरपंच रविंद्र महाजन कोचुर खु॥ ,मा सरपंच स्वाती परदेशी, मनोज परदेशी,संतोष परदेशी ललीत महाजन,कैतिक महाजन ,पंडीत पाटील, विलास राऊत सुभाष विचवे,जिवन येवले ,विशाल पाटील,शैलेंद्र पाटील,रितेश परदेशी, पितांबर पाटील,संतोष पाटील, चंद्रकांत पाटील,युवामोर्चा अध्यक्ष योगेश कोळी,पंकज गव्हाळ,विनोद विचवे. राजु विचवे. निलेश येवले. योगेश राऊत.उपस्थित होते.

अगोदर सि एम व्ही व्हायरस व आता वादळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे वादळी पावसामुळे केळी, मका, ज्वारी, कापूस जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. याचे व्यवस्थित पंचनामे होऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली त्यांनी संबंधित प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश देण्याचे मान्य केले आहे.

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी सुद्धा मदत व पुनर्वसन खात्याचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्या सोबत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी चर्चा केली आहे.
– रोहिणी खडसे खेवलकर

Leave A Reply

Your email address will not be published.