कै.आचार्य गजाननराव गरुड यांच्या स्मृतीदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

शेंदुर्णी ता.जामनेर | प्रतिनिधी

येथिल धी शेंदुर्णी एज्यु सो. चे संस्थापक व विधानसभेचे माजी उपसभापती कै आचार्य बापुसाहेब गजाननराव गरुड यांच्या ३६ व्या स्मृतीदिनी दि .२० डिसेंबर रविवार रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन यंदाची व्याख्यानमाला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात येत असल्याचे स्मृतीदिन आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी संस्थेच्या शाखांमध्ये कै. बापुसाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे. तर सकाळी संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सतिश काशीद, महिला संचालिका सौ.उज्वलाताई काशीद, सभासद सदस्य प्रमुख मान्यवर कर्मचारी यांच्या उपस्थीतीत येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुणांना फळवाटप, सकाळी १०वा. गरूड प्राथमिक शाळेमध्ये भव्य रक्तदान शिबीर, ऑनलाईन निबंध स्पर्धांचा निकाल, ऑनलाईन मॅरेथॉन स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भव्य रक्तदान शिबीर –

कोरोना महामारीमुळे रक्ताचा तुटवडा पडला असुन कोरोना नियमावलीचे पालन करून गरूड प्रार्थमिक विद्यामंदीरामध्ये सकाळी १० वाजता जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करून रुग्णसेवे मध्ये मोलाचे योगदान करण्याचे आवाहन स्मृतीदीन नियोजन समितीद्वारे करण्यात येत आहे.

आनलाइन मॅरेथॉन – एक धाव कोरोना योध्याची शान

स्वस्थ भारत – तंदूरस्थ भारत या संकल्पनेवर आधारित 5 की.मी.चालणे, 10 की.मी.धावणे,10 की.मी.सायकल चालविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना  दिनांक 20डिसेंबर ते 27डिसेंबर 2020 या कालावधीत केव्हाही सहभाग नोंदवता येणार आहे .  कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेऊन ऑनलाइन पद्धती ने आयोजित केलेल्या  या नाविन्यपुर्ण उपक्रमात धावणे,चालणे व सायकल चालविणे या साठी आपण आपल्या आवडीच्या मार्गाची  निवड करू शकतात.( आपल्या परिसरात ,अंगणात,गच्चीवर  शाळेचे  क्रीडांगण,  मोकळ्या जागेवर सुरक्षीत अंतर ठेवून हा उपक्रम करायचा आहे) उत्कृष्ट धावकास उत्तेजनार्थ मेडल दिले जाईल. अनुक्रमे प्रथम पुरस्कार कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड ,द्वितीय पुरस्कार कै. आण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड व तृतीय पुरस्कार कै .आबासाहेब काशिनाथराव गरुड यांचे स्मरणार्थ दिले जातील. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल. आपण चालणे,धावणे,सायकल चालविणे यापैकी कोणतेही एका स्पर्धेत सहभागी होवू शकतात.
स्पर्धेत सहभागासाठी प्रा डॉ ए. एन.जिवरग 8956764660, प्रा डॉ सौ योगिता चौधरी मॅडम मो.क.9730624397, प्रा.डॉ.महेश पाटिल मो.क्र .8329470146, प्रा.डॉ.दिनेश पाटिल.मो.9764598999 संपर्क साधावा.

भव्य रक्तदान शिबिर आणि मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चे आवाहन “धी शेंदुर्णी सेकं. एज्युकेशन को- ऑप. सोसायटी चे अध्यक्ष -मा. श्री संजयदादा गरुड व सचिव- सतीशचंद्र काशीद व सहसचिव- दिपक गरुड व प्रधानकार्यालय वसतिगृह सचिव- कैलास देशमुख तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य- डॉ वासुदेव  पाटील ,उपप्राचार्य आर.जी.पाटील, मुख्याध्यापक एस.पी. उदार सर व  प्रा.डॉ. महेश पाटील, प्रविण गरुड अध्यक्ष- आदर्श तरुण मित्र मंडळ शेंदुर्णी , अरीफभाई .अध्यक्ष- संजयदादा सांस्कृतिक व  क्रीडा मंडळ शेंदूर्णी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.