केरळात डाव्यांच्या बॅनर्सवर झळकला किम जोंग उन यांचा फोटो

0

थिरूवनंतपुरम-

केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) बॅनर्सवर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची छायाचित्र झळकल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. येथील इडुक्की जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रादेशिक स्तरावरील परिषदेच्या प्रचारासाठी हे बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र, ही परिषद संपून दोन दिवस उलटल्यानंतरही हे बॅनर्स तसेच ठेवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.

याशिवाय, किम जोंग उन यांचे छायाचित्र बॅनरवर लावण्यावरून अनेक प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. याबद्दल विचारणा केली असता इडुक्की येथील सीपीएमचे सचिव के.के. जयचंद्रन यांनी म्हटले की, किम जोंग उन हे अमेरिकेला आव्हान देणारे एकमेव साम्यवादी नेते असल्याची भावना आमच्या काही कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र, पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही. त्यामुळे आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना हे बॅनर्स काढून टाकण्याचे आदेश दिले होते आणि त्याची अंमलबजावणीही झाली होती. केवळ पॅम्पादुम्पारा या गावातील एक बॅनर उतरवण्यात आला नव्हता. त्यानंतर आम्ही तेथील नेत्यांना तत्काळ आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याचे जयचंद्रन यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.