केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

0

अमळनेर (प्रतिनिधी):-शुक्रवारी केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी अशा आशयाचे निवेदन महिला राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार मिलिंद वाघ यांना दिले आहेत.  सध्या मोठ्या प्रमाणात  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कांदा पीक लावलेले आहे. कांद्याला चांगला भाव मिळायला लागला होता की लगेच भाजप सरकार ने कांदा निर्यात बंदी घातली.

ही निर्यात बंदी बिहार मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घातली आहे हे अवघ्या देशाला माहिती आहे. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सरकार नाही असे यातून स्पष्ट होते. या एका निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी केंद्रातील मोदी सरकारने देशोधडीला लावला आहे. दुष्काळ, गारपीट, टंचाई, रोगराई अशा कित्येक नैसर्गिक आव्हानाचा सामना करत असताना शेतकऱ्याने पोटाच्या मुलांप्रमाणे सांभाळलेले पीक शेतकऱ्यांना मातीमोल भावाने विकावे लागणार आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी टिकला तर शेती पिकेल. कोरोनाच्या या संकटकाळात डॉक्टर, पोलीस, प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत राबताना दिसला तो हा बळीराजा. या निवेदनाद्वारे आम्ही आपणांस विनंती करतो कि सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करुन केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी रद्द करावी व शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी जि.प. सदस्या जयश्री अनिल पाटील, जळगाव जिल्हा बँक संचालिका अ‍ॅड.तिलोत्तमा पाटील, नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षक रंजना देशमुख, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष योजना पाटील, अलका पवार, भारती शिंदे, पंचायत समिती सदस्य निवृत्ती बागुल, अर्बन बँक संचालक प्रविण पाटील,डांगरीचे माजी सरपंच अनिल सिसोदे आदी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.