”सबका साथ सबका विकास” हे ब्रिद अंगिकारून पंतप्रधान मोदी करत आहेत आत्मनिर्भर भारताची निर्मिती – रोहिणी खडसे-खेवलकर

0

मुक्ताईनगर येथे भा. ज. यु.मो.च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

मुक्ताईनगर (प्रतिनीधी) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने दि 17 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर पर्यंत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्या अंतर्गत संजिवनी हॉस्पिटल मुक्ताईनगर येथे भारतीय जनता पक्ष मुक्ताईनगर आणि भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी 50 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रोहिणी खडसे खेवलकर ह्या म्हणाल्या.

युवा शक्तीचे प्रेरणास्थान, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अव्याहत झटणारे, आदर्श पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी आधुनिक विचारसरणी, धोरणीपणा, सकारात्मक दृष्टिकोन आणि दूरदर्शी नेतृत्वातून देशात अमुलाग्र असा सकारात्मक बदल घडवून आणला आहे. अनेक महत्वकांशी योजनांमधून सामान्यातील सामान्य नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य त्यांनी साधले आहे.
सबका साथ,सबका विकास,सबका विश्वास हे ब्रीद अंगिकारून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी मोदीजी अथक मेहनत घेत आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांनी विविध योजना सुरू केल्या आहेत.

देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना आमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरली. व्यापार सुलभ बनवण्यावर भर देण्याबरोबरच त्यांच्या ‘मेक इन इंडिया’ या आवाहनामुळे गुंतवणूकदार आणि उद्योजकांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला. श्रम सुधारणा आणि ‘श्रमेव जयते’ उपक्रमाअंतर्गत श्रम प्रतिष्ठेमुळे लघु आणि मध्यम उद्योगांमधील अनेक कामगारांचे सशक्तीकरण झाले तसेच कुशल युवकांना देखील प्रोत्साहन मिळाले. मुद्रा योजने अंतर्गत स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यास मदत झाली.

मोदी सरकारने येथील जनतेसाठी तीन सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या आणि त्याचबरोबर ज्येष्ठांना निवृत्तीवेतन आणि गरीबांना विम्याचे कवच देण्यावर भर दिला. जुलै 2015 रोजी पंतप्रधानांनी ‘डिजिटल इंडिया’ अभियानाचा शुभारंभ केला. जनतेच्या जीवनमानात गुणात्मक बदल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा कल्पक आणि अधिकाधिक वापर करणारी ही योजना आहे.

मोदीं कलम 370 रद्द करून सार्वभौम भारताची निर्मिती केली त्यातुन प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्तीचा जागर झाला
यावेळी सर्व रक्तदात्यांना रोहिणी खडसे खेवलकर यांच्या हस्ते मास्क सॅनिटाईजर वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, प स सभापती विद्याताई पाटील, भाजप तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, प स सदस्य राजेंद्र सवळे, चंद्रकांत भोलाने, विनोद पाटील,नगरसेवक पियुष महाजन, मुकेश वानखेडे, डॉ प्रदीप पाटील, शिवराज पाटील, निलेश मालवेकर, सुभाष खाटीक, मुन्ना बोडेभैय्या पाटील, कल्पेश पाटील, शुभम काळे हर्षद महाजन, महाजन, चिटणीस सोमनाथ पाटील,प्रभाकर सोनवणे,सोपान कांडेलकर, संजय काटोने, समाधान पाटील,आकाश कुऱ्हाडे, अनिल खिरडकर,अमोल वानखेडे, गणेश सोनवणे, उमेश डुकरे, बबलू पाटील, भाजप आणि युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.