कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे केले उल्लंघन

0

अहमदपूर :  लातुर जिल्ह्यात जिल्हाअधिकारी यांनी कोवीड-१९ च्या वाढत्या प्रभावामुळे साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८नुसार फौजदारी संहिता १९७३ नुसार ५० पेक्षा अधिक लोकांची संख्या एका जागी येऊ नये आणी तसे झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येण्याची पाहीती आदेशीय पत्रा अन्वे माहीती कळवीली असुन अहमदपूर

कृषी उत्पन्न बाजार समितीत दि. ०६ मार्च रोजी शिवभोजन थाळी कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन करण्यात आले असुन या कार्यक्रमात कोवीड-१९ या महामारीवीषयी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे दिवसा ढवळ्या उल्लंघन केले असुन रोड वरील वाहनांवर कार्यवाही करणार्या नगरपरिषदेचे या कार्यक्रमाकडे डोळेझाक केली तर कार्यवाहीचे आदेश देणार्या आधिकार्यांनी डोळेझाक केली आहे.

सहविस्तर व्रत्तांत असा की, कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदपूर येथे ०६ मार्च रोजी शिवभोज थाळी च्या शुभारंभाचे भव्य आयोजन शिवभोजथाळी चे रविशंकर गादगे यांनी केले होते तर कार्यक्रमात आ.बाबासाहेब पाटील यांची पणन महासंघाच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृ.उ.बा.स.चे सभापती

शिवानंद हेंगणे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर पत्रिकेत उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे,तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांचीही नावे आहेत पण ते कार्यक्रमात उपस्थित नव्हते यांना वगळे तर २०० पेक्षा जास्त लोकांची या कार्यक्रमात उपस्थिती होती जिल्ह्याअधिकारी यांच्या ५० लोकसंख्येची मर्यादा तर स्टेज वरील मान्यवरांनीच पुर्ण केली होती.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे दिवसाढवळ्या या कार्यक्रमात उल्लंघन करण्यात आले असुन लोकांच्या संपर्कात न येता एक व्यक्ती वाहनावरुन जात असताना पोलीसांना समक्ष ठेऊन २०० रुपये दंड सक्तीने वसुल करणारे

नपचे अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमास पाठफिरवली असुन यांना आदेश देणारे वरिष्ठ अधिकारी यांनी डोळे झाक केली असुन तहसील कार्यालयाने नगरपरिषदेला जबाबदीरी दिली असुन कोणत्याही राजकीय कार्यक्रमास संमंधित अधिकारी बगल देत आहेत व कार्यक्रम थाटा माटात होत आहेत पण सामान्य लोकांकडुण मात्र दंड वसुल केला जात आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.