काशी एक्सप्रेसमध्ये सापडले सहा महिन्याचे गोंडस बाळ

0

जळगाव | प्रतिनिधी 

भुसावळकडून मुंबईकडे जाणारी काशी एक्सप्रेसमध्ये एक सहा महिन्याचे गोंडस बाळ आढळून आल्याने भुसावळ रेल्वे परीसरात खळबळ उडाली होती. आईवडीलांचा शोध घेतला असल्याने मिळून न आल्याने बाळ जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत भुसावळ रेल्वे पोलीसात बाळ सापडल्याचे नोंद करण्यात आली.
काशी एक्सप्रेस भुसावळकडून मुंबईकडे जात असतांना दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास एका बोगीत बेवारस स्थितीत बाळ आढळून आल्याचा प्रकार रेल्वे पोलीसांच्या लक्षात आला. दरम्यान हे बाळ कुणाचे आहे अशी चौकशी सुरू असतांना कोणीही मिळून आले नाही. दुपारी रेल्वे दीड वाजता भुसावळ रेल्वे स्थानकात आल्यानंतर काही वेळ रेल्वे थांबवून संपुर्ण रेल्वेत कुणाचे बाळ हरविले आहे का? अशी विचारणा करून चौकशी सुरू होती. बाळाचे आईवडील किंवा कुणी नातेवाईक यांचा थांगपत्ता न लागल्याने अखेर रेल्वे पोलीसांनी भुसावळातील जीआरपी पोलीसांच्या ताब्यात दिले. ही घटना घडल्यानंतर जीआरपी विभागाने जळगावात कार्यरत असलेले समतोल प्रकल्पाच्या सपना श्रीवास्तव यांच्याशी संपर्क करून याची माहिती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.