ऐन ईदच्या कालावधीत रेशन दुकानात धान्याचा तुटवडा

0

पंचशिलनगरवासीयांचे हाल; तहसीलदारांना दिले निवेदन

भुसावळ | प्रतिनिधी 

धान्याचा कोटा कमी मिळाला म्हणून ऐण ईद सणाच्या तोंडावर रेशन दुकानात धान्य नसल्याचे सांगून  येथील पंचशील नगर भागातील रेशनदुकानदार नागरिकांना त्यांचे हक्काचे रेशनवरील धान्य देत नसल्याने या दुकांदाराविरुद्ध दिनांक 27 मे रोजी दुपारी नितेश डोंगरदिवे याचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली. पंचशील नगर भागातील रेशनडुकण क्रमांक 39/2 याचे दुकानदार शेखर पगारे यांचेकडे पंचशीलनगर मधील रहिवासी राशन धान्य दुकानदार यांचेकडे  या महिन्यातील धान्य (रेशन ) घेण्यासाठी गेले असता दुकानदार पगारे यांनी या महिन्यात धान्य कमी मिळाले आहे 3 पोती गहू व 2 पोती तांदूळ आम्हाला वरून मिळाले असल्याने आम्ही  सर्वांनाच देऊ शकत नाही रेशन देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. आधीच गरिबांचे हाताला काम नाही त्यात मिळेल त्यावर काम करून आपले व कुटुंबाचे पोट भरण्याची चिंता सतावते त्यात मुस्लिम बांधवांचा ईद हा महत्वपूर्ण सण सुरू आहे अश्या परिस्थितीत या गरिबांना धान्य मिळत नसल्याने  रेशनवरील धान्य मिळावे या मागणी करीता निवेदन  देण्यात आले आहे . निवेदनावर पंचशीलनगर भागातील शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरी आहे .

मोर्चा काढून निवेदन सादर 

पंचशिल नगर मधिल नागरिकांना स्वस्त धान्य दुकानदार धान्य  देत नसल्याने या दुकानदारावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी परिसरातिल नागरिकांचा तहसिलदार कार्यालयावर नितेश डोंगरदिवे व  राजु डोंगरदिवे यांचे नेत्रुत्वात मोर्चा काढण्यात आला यावेळी नितेश डोंगरदिवे अजगरभाई आकाश विरघट ,सलिमभाई,मुनताजदीदी,शबानाताई,यांच्यासह शेकडो महिला पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.