कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देणार – सपोनि.स्वप्नील नाईक

0

शेंदुर्णी ता.जामनेर | प्रतिनिधी

पोलीस व नागरिक यांच्या मध्ये सुसंवाद साधत सर्वांना सोबत घेऊन आपल्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे,कुणी जर कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पहुरला नव्यानेच नियुक्त झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक यांनी दिला आहे.

जळगांव जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर व मराठवाड्याच्या हद्दीला लागुन असलेल्या राजकीय, सामाजिक दृष्टीने सजग असलेल्या पहुर पोलिस ठाण्यात नव्यानेच नियुक्ती झालेल्या स्वप्निल नाईक यांनी आल्यानंतर आपल्या कामाचा धडाका लावला असुन अवैध धंदे, वाहतुक व्यवस्था यावर करडी नजर ठेऊन जनतेच्या मनात कायदा व सुव्यवस्था याबद्दल जनजागृती करुन आपल्या कामाची चुणुक दाखवली आहे.

सपोनि. स्वप्निल नाईक हे कृषी पदवीधर असुन पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणुन आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली आहे. गडचिरोली, नाशिक ग्रामीण व गेल्या दोन वर्षापासुन जळगांव जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे.

यापुर्वी पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना कमी काळ मिळाला मात्र या कालावधीत त्यांनी आपल्या कार्यामुळे प्रामाणिक व कर्तव्यकठोर अधिकारी म्हणुन आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सपोनि. स्वप्निल नाईक यांनीही सर्वांना सोबत घेत सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.