कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

भुसावळ :-  येथील जामनेर रोड वरील जुनी इदगाह समोरील साई डेअरी जवळील गोरक्षनाथ मंदिराजवळ साफ सफाई करण्याचे कारणावरून परिसरातील नागरिकांनी तो काम करीत असतांना काम करू नको असे म्हणून कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की भुसावळ नगरपालिकेचा सफाई कर्मचारी आनंदा रामदास कुलकर्णी वय ५० रा. वाल्मिक नगर भुसावळ हा दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जामनेर रोड वरील जुनी इदगाह समोरील साई डेअरी जवळील गोरक्षनाथ मंदिराजवळ साफ सफाईकरीत असतांना  आरोपी विलास काशिनाथ जाधव वय ४५ रा कृष्णां नगर जामनेर रोड भुसावळ यांनी  काम करू नको म्हणून वाद निर्माण करीत काम थांबवले .याप्रकरणी दिनांक १५ एप्रिल रोजी फिर्यादी आनंदा रामदास कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  विलास जाधव यांच्याविरुद्ध कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुरन २३४/१९ भादवी कलम  ३५३. ५०४. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबतीत अधिक तपास पो नी देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सारिका खैरनार तपास करीत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.