एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीचा खून; आरोपीस तीन दिवस पोलीस कोठडी

0

भुसावळ – शहरातील  प्रीती ओंकार बांगर (22) या तरुणीचा एकतर्फी  प्रेमातून संशयीत आरोपी प्रवीण विष्णू इंगळे याने सपासप चाकूचे वार करून निर्घृण खून केल्याची घटना दिनांक १४ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास येथील हुडको कॉलनी येथे घडली. या घटनेनंतर शहर पोलिसांनी घटनास्थळावरून त्वरित प्रवीण विष्णू इंगळे या आरोपीस अटक केली होती दरम्यान आज सोमवार दिनांक १५ रोजी आरोपी प्रवीण इंगळे यास भुसावळ न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने तीन दिवस दिनांक १८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहे.

शहरातील पालिकेच्या हुडको भागातील रहिवासी असलेल्या प्रीती ओंकार बांगर (२४ ) या तरुणीशी संशयीत आरोपी प्रवीण विष्णू इंगळे (३४ खडका चौफुली , भुसावळ) याचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते मात्र त्यात कुठल्यातरी कारणातून वितुष्ट आल्यानंतर शनिवार दिनांक १३ रोजी रात्री संशयीत आरोपीने तरुणीशी संपर्क साधला मात्र दोघांमध्ये कटुता कायम असल्याने रविवारी १४ रोजी रात्री नऊ वाजता संशयीत आरोपी तरुणीला भेटण्यासाठी आला मात्र त्यावेळीही त्याचा अपमान करण्यात आल्याने त्याने संतापाच्या भरात तरुणीच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार केले मात्र हल्ल्यातून बचावासाठी ही तरुणी कॉलनी भागातील सीमा ओंकार तायडे यांच्या घरात धाव घेऊन आश्रयाला आली मात्र तेथेही आरोपीने तिच्यावर हल्ला चढवल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होवून ती उपचारापूर्वीच मृत्यू

झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. या हल्ल्यानंतर आरोपी जागीच थांबून असल्याने रहिवाशांनी शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यास  हत्यारासह रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

आरोपी प्रवीण विष्णू इंगळे (३४ रा खडका चौफुली, भुसावळ) खाजगी वाहनांवर चालक म्हणून कामास आहे. प्रेमसंबंधातील तरुणीच्या सहा पैकी पाच बहिणी विवाहित आहेत.याप्रकरणी  आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो नी बाबासाहेब ठोंबे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि एन एस (नाना) सूर्यवंशी तपास करीत आहे. दरम्यान आरोपी प्रवीण इंगळे यास भुसावळ न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीची आदेश न्यायालयाने दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.