कांचननगरातील तरुणाची आत्महत्या

0

जळगाव : शहरातील कांचन नगरात एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रशांत नारायण डाबोरे (वय-21) असे या तरुणाचे नाव असून ही घटना आज पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान याबाबत शनीपेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

प्रशांत डाबोरे याने भाऊ आणि आई गाढ झोपेत असतांना मध्यरात्री 3.30 वाजेच्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भावाच्या लक्षात आल्याने उघडकीस आले. अत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नातेवाईकांनी तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. याबाबत शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास रघूनाथ महाजन करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.