आज पाचोऱ्यात लुम्बिनी बुद्ध विहारात मूर्तीप्रतिष्ठापणा

0

पाचोरा :- पाचोरा येथील एस.टी.स्टँड च्या पाठीमागे असलेल्या भीमनगर परिसरात बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आज दि.१८ रोजी लुम्बिनी बुद्धविहारात भगवान गौतम बुद्ध यांच्या ६ फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

सकाळी १० वाजता प्रथम ध्वजारोहण भन्तेजी यांच्या हस्ते  होणार असून  या कार्यक्रमास औरंगाबाद येथील बुद्धरत्न भन्ते यांच्या हस्ते मूर्तिप्रतिष्ठापना होणार आहे. तदनंतर भन्ते बुद्धरत्न यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास तमाम बुद्ध उपासक बंधू भगिनींनी पांढरे वस्त्र परिधान करून उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष संजय गोहिल, अमोल शिंदे,नगरसेवक भूषण वाघ ,भावराव पवार, त्रिशीला लोंढे, अॅड. अविनाश भालेराव, बापू ब्राह्मणे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मूर्तिकार यशवंत भिवसने, राजेंद्र भिवसने यांचा विशेष सत्कार होणार असून कार्यक्रमाचे संयोजन माया केदार, संगीता साळुंखे यांनी केले आहे. कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था केली असून उपस्थितीचे आवाहन लुम्बिनी बुद्धविहार समितीच्या पदाधिरकारी आणि कार्यकर्त्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.