कर्जमुक्तीची नांदी; महापालिका जेडीसीसीच्या कर्जातून मुक्त

0

जळगाव :– महापालिकेने 4 कोटी 69 लाख 56 हजार 833 रुपये एकरक्कमी चेक देवून जिल्हा बँकेच्ंया कर्जातून चार महिने बाकी असताना मुक्तता करुन घेतली आहे.

यावेळी आ. राजुमामा भोळे, महापौर सिमा भोळे यांना जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व संचालक ॲड. रविंद्र पाटील यांनी कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र बुधवारी महापौरांच्या दालनात दिले.

हुडको कर्जाचा विषयही लवकरच मार्गी लावू असे आ. भोळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्तता ही मनपाच्या कर्जमुक्तीची नांदी असून लवकरच महापालिका कर्जमुक्त होणार असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.

याप्रसंगी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, सदाशिवराव ढेकळे, धिरज भालेराव, उज्ज्वला बेंडाळे, नवनाथ दारकुंडे, विशाल त्रिपाठी मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे उपस्थित होते.

जळगाव महानगरपालिकेने  जिल्हा बँकेकडून सन 1997 ते 2001 या दरम्यान विकासकामांसाठी 59.34 कोटींचे कर्ज घेतले होते. सदर कर्जाची तत्कालीन नगरपालिका व महापालिकेने 1997 ते 2019 पर्यंत व्याजासह 194 कोटी 82 लाख, 76 हजार इतकी रक्कम जुलै 2019 अखेर भरली आहे. जिल्हा बँकेने नोव्हेंबर 2017 मध्ये दिलेल्या कर्जफेड शेड्युल नुसार गुलै 2019 ते डिसेंबर 2019 पर्यंत दरमहा 1 कोटी प्रमाणे नियमित कर्जफेड केल्यास संपूर्ण कर्जाची सहा महिन्यात मुद्दल रक्कम 5 कोटी 52 लाख 3 हजार व व्याज 20लाख 59 हजार अशी एकूण 5 कोटी 72 लाख 63 हजार इतकी रक्कम भरावी लागणार होती. 19 जुलै रोजी 1 कोटीचा हप्ता भरल्यावर मुद्दल 4 कोटी 66 लाख 41 हजार 206 व 19 दिवसांचे 13 टक्के दराने व्याज 3 लाख 15 हजार 827 असे  एकुण रक्कम 4 कोटी 69 लाख 56 हजार 833 भरावी लागणार होती. बँकेच्या शेड्युलप्रमाणे डिसेंबर अखेर 5 कोटी 72 लाख 83 हजार313 इतकी रक्कम होते. मात्र बुधवारी एकरक्कमी कर्ज फेड केल्याने महापालिकेचे 1 कोटी 3 लाख 6 हजार 480 रुपयांची बचत होत आहे. एकरक्कमी फेड केल्याने दर महा 1 कोटी भराव्या लागणाऱ्या रक्कमेची बचत होणार असून ती विकासकामांसाठी वापरता येणार असल्याचे सुत्रांकडून समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.