करोनावरील औषधाची पहिली खेप ‘या’ ५ राज्यांना रवाना

0

नवी दिल्ली : करोना व्हायरसवरील जेनेरिक औषधाची पहिली खेप सर्वाधिक प्रभावित असलेल्या पाच राज्यांना पाठवण्यात  आली आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि तेलंगणमधील हैदराबादचा समावेश आहे. औषधाचे २० हजार व्हायल या राज्यांना पाठवण्यात आल्या आहेत.

हैदराबाद येथील हेटरो कंपनीने रेमडेसिव्हरचे जेनेरिक व्हर्जन ‘कोविफोर’ नावाने तयार केले आहे. तिथे ही या औषधाच्या पहिल्या खेपेचा वापर होणार आहे. हेटरोच्या मते, कोविफोरच्या 100 मिलिग्रॅम बाटलीची किंमत 5400 रुपये असेल. कंपनीने पुढील तीन ते चार आठवड्यात एक लाख बाटल्यांची निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

सध्या हे इंजेक्शन हैदराबाद येथील कंपनी फॉर्म्युलेशन फॅसिलिटीमध्ये तयार होत आहे. औषधाचा ऍक्टिव्ह फॉर्मास्युटिकल इन्ग्रिडिएंट (एपीआय) विशाखापट्टणमच्या युनिटमध्ये तयार होत आहे.

औषधाची पहिली खेप भोपाळ, इंदूर, कोलकाता, पाटणा, लखनऊ, रांची, भुवनेश्वर, कोची, विजयवाडा, गोवा आणि त्रिवेंद्रम येथे पाठवण्यात येणार आहे. हे औषध रुग्णालय आणि सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. सध्या मेडिकलमध्ये ते मिळणार नाही.

औषध निर्माती कंपनी सिप्लाने रेमडेसिव्हर तयार करणारी अमेरिकन कंपनी गिलिएड सायन्सेस इंकबरोबर लायसेसिंग ऍग्रीमेंट केले आहे. सिप्ला कंपनीही हे औषध तयार करुन ते विकणार आहे.

कंपनीच्या मते, या औषधाची किंमत 5000 रुपयांपेक्षा कमी असेल. भारतातील ऍलोपॅथी औषधांवरील नियामक कंपनी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) सिप्ला आणि हेटरो या दोन्ही कंपनींना गंभीर कोरोना रुग्णांवर आणीबाणीच्यावेळी औषध वापरण्याची परवानगी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.