कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिराची हिवाळी शैक्षणिक सहल संपन्न

0

जळगाव – प्रगती शिक्षण मंडळ संचलित,कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर , जळगाव शाळेची हिवाळी शैक्षणिक मुक्ताईनगर परिसर येथे काढण्यात आली. सहलीमध्ये इ. ३ रीते१० वी चे १५० पेक्षा जास्तविद्यार्थी सहभागी झाले.विद्यार्थ्यांनी हतनूर धरण, संत मुक्ताबाई मंदिर, चांगदेव मंदिर, हरताळा तलाव अश्या निसर्गरम्य ठिकाणी सहल काढण्यात आली. विद्यार्थ्यांना शाळेतर्फे खाऊ वाटण्यात आला. निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांनी सहभोजनाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खेळ खेळले.

सदर सहलीचे आयोजन मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी यांनी केले, तर नरेंद्र वारके, वंदना नेहेते, राजेंद्र पवार, राहुल धनगर, श्रीकांत पाटील, निलेश नाईक, संगीता निकम, सुवर्णा सोनार, भूषण बऱ्हाटे आदींनी सहलीसाठी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.