कपाशी बोंडअळी नुकसान अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करावी

0

शेतकरी संघटनेची मागणी

पारोळा ;- कपाशीवरील बोंडअळी नुकसान भरपाई व पीककर्ज बोझा वरिल विविध विषयांवरील निवेदन शेतकरी संघटना पारोळा तालुका यांनी तहसीलदार वंदना खरमाळे यांना दिले शेतकऱ्यांनासरकारने जाहीर केलेली बोंडअळी नुकसान भरपाईस जे अनुदान सरसकट पद्धतीने देण्यात यावे. असे जाहीर केले. परंतु ते अनुदान टप्प्या टप्प्याने देणार आहेत. तसे न करता सरसकट पद्धतीने द्यावे. असे शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी तहसीलदार यांच्या समोर मांडला .तरी कपाशी वरील बोंड अळी नुकसान भरपाई ७ दिवसाच्या आत मिळावी .व सदर रक्कम ती शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करून ती कर्जखात्यात वर्ग करू नये. तसे वर्ग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बँक कर्मचारयावर गुन्हे दाखल करण्यात येतील अशा सुचना आपल्या स्तरावरून बँकांना देण्यात याव्यात जे.डी.सी.सी.बँककडून शेतकरींना केवळ कर्ज मंजूर करून किसान कार्ड अदा केले जात आहे. बँक शाखांमधून रोख रक्कम दिली जात नाही. तो किमान ५०% तरी देण्यात यावी. सरकारची कर्ज माफी योजना लाभार्थी यादि २३/२/२०१८ पासून आलेली नाही . त्यावर त्वरीत कार्यवाही व्हावी याबाबत तात्काळ कार्यवाही करनेत यावी . तसे न झाल्यास शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करील याची नोंद घ्यावी . असे शेतकरी संघटनेने निवेदनात म्हटले आहे ,

तहसीलदार वंदना खरमाळे यांना निवेदनातून देतांना शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील (जोगलखेडे) दत्तू पाटील (मंगरूळ) श्नीराम पाटील(मंगरूळ) सुनील पाटील (मंगरूळ) राजू पाटील(मंगरूळ) शिरीष पाटील (पारोळा) नरेश पाटील(पारोळा) राजू पाटील (जोगलखेडे) पंकज पाटील (जोगलखेडे) राहूल पाटील (जोगलखेडे) सोनुसिंग पाटील (वंजारी) इतर तालुक्यातील शेतकरी बहूसंख्यने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.