कत्तलीसाठी गुरांची वाहतूक; चालक अटकेत

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

लोहारा ता. पाचोरा गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला एक ४०७  टेम्पो उभा होता. त्यात महेंद्र घोंगडे व आप्पा चौधरी यांनी बघितले असता त्यांना अमानुषपणे गुरांची वाहतूक होतांना दिसून आल्याचे तसेच सदरील गुरे हे कत्तलीसाठी नेत असल्याचे निदर्शनास आले.

सदर विषयी बजरंग दल कार्यकर्ता यांनी गाडीच्या चालकास विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिल्यानंतर शंका आल्यावर बजरंग दल संयोजक महेंद्र घोंगडे यांनी लोहारा येथील हेमंत गणेश गुरव यांना फोन वरून सगळ्या घटनेची माहिती दिली. त्यांनी गाडी लोहारा आऊट पोस्ट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याचे सांगितले. हेमंत गुरव यांनी तात्काळ पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, वरिष्ठ पोलीस अधिकारी एडिशनल एस. पी. चाळीसगाव डिव्हीजनचे रमेश चोपडे, तसेच पाचोरा उपविभागीय पोलीस उपअधीक्षक भारत काकडे, यांच्याशी फोनवरून संपर्क करून सदर विषयाची सविस्तर माहिती दिल्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचने नुसार सदरील गुरांची गाडी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली.

पोलीसांनी वाहनासह ३ लाख ६७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  पोलीस नाईक अरुण राजपूत यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीसात  गुन्हा दाखल करण्यात आला असून मुजाहिद रफीक शेख रा. रा. मुल्लावाडा, पाचोरा आणि आबीद खान अकमल खान (वय ४०, रा. इस्लामपूर चाळीसगाव) या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

यानंतर गुरांचा पंचनामा करून सदरील ६ गुरे (बैल) हे वरखेडी येथील महावीर गौशाळा येथे रवाना करण्यात आले. तसेच पोलीस स्टेशनचे कार्यरत असलेले गोपनिय शाखेचे पोलीस नाईक अरुण राजपूत यांच्या फिर्यादीवरून सदरील गुन्हा दाखल करण्यात आला असून लोहारा येथील रामराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कोळी, लोहारा बजरंग दल शाखा संयोजक महेंद्र घोंगडे, सह संयोजक राहुल चौथे, तसेच लोहारा गौ रक्षा प्रमुख गजानन चौधरी हे साक्षीदार असून पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार अरविंद मोरे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.