‘ओल्या दुष्काळा’साठी बच्चू कडूंचे आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात

0

मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला.  मात्र, राजभवनावर जाण्याआधीच हा मोर्चा पोलिसांनी अडवला असून कडू यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत, पोलिसांची गाडी अडवली.

यावर्षी परतीचा पाऊस आणि नंतर अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने राज्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योग्य तो निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपालांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेची दखल घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली होती.

सर्व प्रशासकीय अधिकार राज्यपालांकडं आहेत. ते शेतकऱ्यांच्या समस्या ऐकत नसतील तर त्यांनी सूत्रे हातात का घ्यायची? ते फक्त राजभवनात बसण्यासाठी आहेत का,’ असा सवालही शेट्टी यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.