ओबीसीचे राजकीय आरक्षण पुर्ववत करा ; समस्त माळी समाज

0

 धरणगांव  (प्रतिनिधी) येथिल माळी समाज मोठा माळीवाडा व लहान माळी वाडा पंच मंडळा कडुन नायब तहसीलदार सातपुते यांना ओबिसी संवर्गाचे ग्रामपंचायत, पंचायत सामिती, जिल्हा परिषद. नगर परिषद, महानगरपालीका मध्ये मिळणारे वैद्यानिक आरक्षण पुर्ववत मिळावे. तसेच ” ओबीसीं ” संवर्गातील जातींची जनगणना करावी.या मांगणी साठी माळी समाज अध्यक्ष  विठोबा नामदेव माळी, रामकृष्ण माळी, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख जळगांव  गुलाबराव वाघ , माजी नगराध्यक्ष   ज्ञानेश्वर महाजन , भाजपा, ओबिसी जिल्हा अध्यक्ष  संजय महाजन यांचा  नेतृत्वाखाली  प्रातिनिधीक स्वरूपात निवेदन देण्यात आले.लवकरच पूर्ववत राजकीय आरक्षण न दिल्यास या पुढील आंदोलन तिव्र स्वरूपात करण्यात येईल ,त्यावेळी सर्वस्वी जबाबदारी हि केन्द्र व राज्य सरकार ची असेल असा इशारा गुलाबराव वाघ व ज्ञानेश्वर महाजन, संजय महाजन यांनी दिला.

जो पर्यंत आरक्षण लागू होत नाही तो पर्यंत कोणतीही निवडणूक घेवू नका असा इशारा समाज कोषाध्यक्ष व्हि. टी. माळी सर यांनी दिला. तसेच यावेळी ओबीसी आरक्षण! मिळालेच पाहिजे!! या घोषणांनी तहसिल परीसर दणानुन सोडला त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले

याप्रसंगी  उपाध्यक्ष , निंबाजी  महाजन, शिवाजी देशमुख . सचिव दशरथ महाजन, सुधाकर महाजन . कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी सर . सहसचिव डिगंबर माळी, बालाजी पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र मांगो महाजन . तसेच समाजाचे विश्वस्त  शिवसेना शहरप्रमुख , राजेंद्र किसन महाजन. भाजपाचे गट नेते , कैलास माळी सर, बहुजन क्रांती मोर्चा चे ता. संयोजक , आबासाहेब वाघ, भाजपा शहर अध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक , विजय महाजन, विलास महाजन, सुरेश महाजन,  राष्ट्रीय किसान मोर्चा ता. अध्यक्ष गोरख देशमुख,  सुकदेव  महाजन, . युवा सेना प्रमुख संतोष तायडे, कॉग्रेस चे सरचिटणीस  नंदलाल महाजन, आर.डी. महाजन सर, हेमंत माळी सर, पी. डी. पाटील सर, राजेंद्र लोटन महाजन. सुभाष महाजन, फुले ब्रिगेड चे डॉ. धनराज देवरे  , यशवंत पतसंस्थेचे सुधाकर महाजन, मनोज माळी, नरेंद्र ( राजु ) माळी.  रविंद्र माळी. प्रविण माळी.ई. उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.