ऑनलाईन रेशन कार्ड, स्मार्ट सुविधा सेंटरचे आमिष : एकाला १२ लाखात गंडविले

0

भुसावळ दी . 20 (प्रतीनिधी ) –

पॅरॉडाईस सर्व्हिसेस लि.नाशिक या कंपनीकडून ऑनलाईन रेशनकार्ड जोडणी स्मार्ट सेंटर व सुविधा सेंटर देण्याच्या आमिषाने तालुक्यातील साकरी येथील एकास 11 लाख 57 हजारात गंडवल्याप्रकरणी साकरी येथीलच एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

11 लाख 57 हजारांमध्ये गंडवले

भुसावळातील शिक्षक कॉलनीतील रहिवासी व ई सेवा केंद्र चालक असलेल्या संजय श्रीराम पाटील (५०) यांच्याशी संशयीत आरोपी संदीप शामराव सपकाळे (३५, रा.साकरी, ता.भुसावळ) याने सलगी वाढवून पॅरॉडाईस सर्व्हिसेस लि.नाशिक या कंपनीकडून ऑनलाईन रेशनकार्ड जोडणी स्मार्ट सेंटर व सुविधा सेंटर मिळवून देण्याचे आमिष दाखवत मार्च २०१५ ते ६ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ११ लाख ५७ हजार रुपये उकळले. तीन वर्षानंतरही काम होत नसल्याने तक्रारदाराने आरोपीकडे पैशांची मागणी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने शहर पोलिसांकडे तक्रार अर्ज करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, प्रभारी निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांनी अर्जाची चौकशी करून १८ रोजी आरोपी संजय पाटीलविरुद्ध फसवणूक व पैशांचा अपहार केल्याने कलम ४२० व ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर १५ रोजी आरोपीला अटक करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश कोळी करीत आहेत.

चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लेटरहेडवर दिली ऑर्डर

संशयित आरोपीने फिर्यादी संजय श्रीराम पाटील यांच्यासह जिल्ह्यातील १४ लोकांना सेतू सुविधा केंद्र मिळाल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या लेटरहेडवर तसेच उपजिल्हाधिकारी जळगाव यांच्या सहीनिशी ऑनलाइन मेलवर पत्राच्या प्राप्त ऑर्डरमध्ये नमूद केले आहे . प्राप्त पत्राच्या ऑर्डरमध्ये गुजरात इन्फोटेक लिमिटेड यांच्याकडून प्रत्येक तालुकास्तरीय सेतुचा ताबा घेऊन हस्तांतरित करण्यात यावे तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील सेतू सुविधा केंद्राचे करारनामे साक्षांकित करून घ्यावे व पुढील आठ दिवसाच्या आत नवीन सेतु सुविधा पुरवठादार यांनी आपापला सेतू ताब्यात घेऊन तो सुरू करणे बंधनकारक आहे सेतू सुविधा कक्ष दिलेल्या मुदतीत सुरु न करू शकल्यास करारनाम्यातील अटी व शर्ती प्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे .तसेच फिर्यादी पाटील यांना महाराष्ट्र शासन यांच्याकडील फी भरल्याची पावती चक्क मेलवर पाठवली आहे तीन पावत्या मध्ये तीन हजार, दहा हजार व ४५ हजार अशी रक्कम जमा झाल्याच्या पावतीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
व या पावतीवर महाराष्ट्र शासनाचा शिक्का सुद्धा आहे.

दरम्यान सेतू सुविधा व स्मार्ट कार्ड जोडणी च्या कार्यात कोण कोण अधिकारी चा समावेश आहे हे देखील चौकशीअंती समोर येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.